सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्नं पडलं. एक जटाधारी, पिळदार शरीरयष्टीचा तेजःपुंज बैरागी आपल्या अंगाखांद्यावरून फिरताना तो महाराष्ट्र पाहू लागला. पूर्वी स्वतः श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण त्यांचा दास मारुतीरायांसह याच भूमीवर वावरून गेले होते. आताही त्या भगवान रामचंद्रांचा दास म्हणवणारा, मारुतीरायांना गुरुबंधू मानणारा एक विरक्त राजयोगी सह्याद्रीच्या कडेकपार्यात, शिवछत्रपतींच्या या आनंदवनात मुक्त संचार करीत होता. लोकांची गार्हाणी समजून घेत होता. लोकांना केवळ भजनी न लावता शक्ती-युक्तीच्या जोडाने प्रत्येक संकटावर मात करा असं समजावत होता. हा राजयोगी म्हणजेच – समर्थ रामदासस्वामी! समर्थाचं चरित्रं हे पुढील काळात अनेक दंतकथा आणि गैरसमज मिसळल्याने निराळंच भासलं, पण प्रत्यक्ष हा कर्मयोगी होता तरी कसा? समर्थांच्या समकालीन काव्यांतून, कागदपत्रांतून, त्यांच्या शिष्यांनी केलेल्या वर्णनातून ते प्रत्यक्ष कसे होते हे सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
There are many misconceptions about Samarth Ramdasswamy in Maharashtra and outside Maharashtra. Often due to the propaganda of the opponents or due to the extra naive devotion of most of the devotees, Ramdas is not portrayed as he is. Therefore, with the exception of Bakhari, the author has tried to show the vision of Ramdas in contemporary documents with the help of documents and miniatures.