वसंत पळशीकरांची या संग्रहातून व्यक्त झालेलले हिंदू-मुस्लिम जातीयवादाची चिकित्सा तिच्या वेगेळेपणातून उठून दिसते. समाजगटांच्या एकत्रित राहण्याच्या अपरिहार्यतेची गरज अधोरेखित करणारी, संयम-विवेकाला दुबळेपणा न मानता त्याची कास धरणारी, आपापली वैशिष्ठ्ये जपत असतानाच मूलभूत एकात्मेतेचा आग्रह धरणारी, पारंपारिक राष्ट्रवादापासून फारकत घेऊन भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणा-या राष्ट्रवादाची कास धरणारी, बहुसांस्कृतिकतेची स्वीकारणारी, द्वेषात्मक प्रचारापासून अलिप्त राहणारी, संताप, अवमान, उपेक्षेच्या भाषिक दुर्गुणांपासून मुक्त असणारी व आपल्या स्वतःच्या श्रेयस्कर जीवनमूल्यांशी सुसंगत राहणारी अशी ही चिकित्सा आहे.
मराठी विश्वातील हमीद दलवाई, अ. भी. शहा, नरहर कुरंदकर यांच्या मुख्य धारणेपेक्षा वेगळी चिकित्सा करून पळशीकरांनी मराठी विचारविश्वात अमूल्य योगदान केले आहे.