“प्रभाकर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे” .. विषयाला किंचीत वळन देत राज बोलला. “अं ?? हो हो.. ” प्रभाकर तंद्रीतून सावरत बोलला, राज सांगत असलेला प्रत्येक मुद्दा तो लक्ष देवून ऐकत होता. “विज्ञानात आपल्याला सांगते की या जगातील प्रत्येक गोष्ट ही उर्जा आहे .. बरोबर का ?” “ह्हो. अगदी” प्रभाकर बोलला. “मग एखादे शरीर काही वेळापुर्वी बोलून चालून चांगले असते, त्याची क्रिया ते करत असते त्यावेळी त्याच्या पाठीमागे त्याची ’उर्जा’ असली पाहीजे, असं जर मी म्हटलं तर त्यात चूक होणार आहे का ? ” “काहीच नाही.” , प्रभाकर बोलत होता पण माना सर्वांच्या हलत होता. “मग जेव्हा तोच व्यक्ती मृत होतो, त्याच्या सर्व क्रिया बंद होता, याचाच अर्थ त्या क्रिया चालवणारी ती ’उर्जा’ आता त्या शरीरात नाही ” असे स
खूप छान अभ्यास आहे , वाचून आनंद झाला. या विषयावर जास्त लिहिले जात नाही अंधश्रद्धा पसरवल्या जातात फक्त. गीतेच्या आधाराने लिहलेले असल्याने यात प्रामाण्य आलेले आहे.