एका मध्यमवर्गीय, परंपरानिष्ठ, तामीळ कुटुंबातील जान्हवीची, अवकाश ही कथा केवळ स्त्रीचा जन्म पदरी पडल्यामुळे, स्वकीयांनी आणि समाजाने अनेक बंधनात वाढवलेल्या आणि त्यांनी दाखविलेल्या दिशेने आयुष्यक‘मणा करणार्या अनेक स्त्रियांचे, जान्हवी हे प्रातिनिधिक रुप. आयुष्यातले अनेक अनुभव, जान्हवीला अचानकपणे स्वत:चीच ओळख घडवतात. आणि नवीन होउन आलेली लेखिका जान्हवी राघवन स्वत:पुढेच उभी ठाकते. स्थलांतर आवर्तन या सानिया यांच्या आधीच्या कादंबर्यातून, जीवनाच्या वेगवेगळया कोनांतून चाचपडत चाललेली, स्व - सामर्थ्याच्या जाणिवांनी सजग होत जाणारी स्त्री - तिचे आत्मभान यांचा प्रतीकात्मक शोध, अवकाश मधेही आहे.