Jump to ratings and reviews
Rate this book

भक्ती आणि धम्म

Rate this book

664 pages, Hardcover

First published January 1, 2016

6 people want to read

About the author

Raosaheb Kasbe

9 books10 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
4 (80%)
4 stars
0 (0%)
3 stars
1 (20%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
2 reviews
November 13, 2021
Amazing book...👌👌👌
ज्यांना डॉ आंबेडकरांचा धम्म जाणून घ्यायचा आहे त्यांसाठी सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे असे मला वाटते. यामध्ये भक्ती हे एक संतांनी चालवलेले आंदोलन असून त्याला प्रतिक्रांतीचाच एक भाग म्हणता येईल असेही लेखकाचे मत आहे. अर्थातच त्याला डॉ आंबेडकरांच्या विचारांची पार्श्वभूमी आहेच. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय क्रांती झाली त्याला संतांच्या चळवळीमुळेच पाठबळ मिळालेलं आहे. त्यामुळेच अठरापगड़ जातींना एकत्र करून शिवाजी महाराज आपले "मावळा सैन्य" स्थापन करु शकले. जाती-जातींमध्ये शिथिलता आणली गेली हेच संतांच्या चळवळीचे साध्य होय. संत पूर्णपणे जातीअंताचा लढा देवू शकले नाही - याला सहाजिकच काळाच्या मर्यादा होत्या हे लेखकाने अतिशय सुसंवादी पद्धतीने सादर केलेले दिसून येते.
संत टाळकुटे होते असे कित्येकजण त्यांच्यावर टिका करतांना दिसतात त्याला न्यायोचित उत्तर लेखकाचे लिखाणाचे वैशिष्ट्य होय. अतिशय मुद्देसुदरित्या भक्ती परंपरेतील "वैश्विक प्रेमाची" मांडणी लेखकाने सविस्तर केलेली आहे. बुद्धाच्या प्रेमाची भाषाच संतांनी आपल्या शैलिने सादर केली आहे, प्रेम म्हणजे अध्यात्मशास्त्रातील गौप्य असे रहस्य - संतांनी आपल्या शब्दांतूनच नव्हे तर आपल्या सम्यक आचरणातूनही यशस्वीरित्या सादर केलेले दिसून येते.
त्या सोबतच वैश्विक पातळीवर घडत असलेल्या घटना लेखकाने उत्तमप्रकारे सादर केल्या आहेत. त्यात प्रबोधन युग व पुनरुज्जीवन म्हणजे काय याचे सविस्तर लिखाण केलेले आहेत. पाश्चिमात्य मध्ययुग हा जसा वैश्विक निरशेचा भाग होता तसा भारतातील मध्ययुग हा फारसा काही वेगळा नव्हता. त्यातही समाजात अमानुष व्यवहार अगदी सामूहिकपद्धतीने स्विकारले जात असत.
पाश्चिमात्य तत्वज्ञान, तत्वज्ञानाचा इतिहास, विज्ञानाची उपपत्ती, वैज्ञनिक दृष्टी इत्यादी अनेक विषय स्पष्ट करतांना त्या शास्त्राच्या निर्मात्याचे सामाजिक-वैचारिक जळणघडणही लेखक स्पष्ट करत जातात हे मला फार उल्लेखनीय वाटले. पाश्चिमात्य प्रबोधन व त्याचे साफल्य म्हणून जगात झालेल्या सामाजिक-राजकीय-वैज्ञानिक क्रांत्या याचा आढावाही लेखक ठिकठिकाणी स्पष्ट करतात.
पाश्चिमात्य प्रबोधन युगाला जशी वैज्ञानिक दृष्टिचि, नवनवीन शोधांची पुरवणी होती तशी भारतीय समाज प्रबोधानाचे साफल्य हे काही अंशी संतांच्या आंदोलनांचे बीजरूप वृक्षच होते असे लेखकाने निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर भारतात इंग्रजांचे आगमन ही दुहेरी बाजू आहे असे लेखक पुरव्यनिशी बोलतात. इंग्रजांच्या आल्याने भारतातील प्रबोधनयुग कश्यप्रकारे सुरु झाले याचे विवेचन खूद्द क्रांतिचे जनक राजा राममोहन राय व महात्मा फुले यांच्या लिखणातूनच उर्ध्रुत करून दाखवितात. सोबतच महात्मा फुल्यांचे दैदिप्तमान कार्याचे बीज वारसा कोणी पुढे का चालविला नाही याबाबत लेखक हळहळही व्यक्त करतात. धार्मचिकित्सा, हिन्दू धर्म, जातीअंताचा लढा, राजकीय उथलापथल इत्यादी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनाक्रम सांगत असतांना - समाजक्रांती करणारे फुले खऱ्या अर्थाने भारतीय प्रबोधनयुगाचे आद्य सुपुत्र होते, त्यांनी लिहीलेलं वाङ्ग्मय हेच पाश्चिमात्य तत्वज्ञानी समाजसुधारकांच्या तोडिचे असून भारतामध्ये त्याची नितांत आवश्यता ही त्या काळाची गरज होती - आणि ती ज्योतिरावांनी बखूबी निभावली - म्हणूनच लेखक त्यांचा "आधुनिक भारताचे जनक" म्हणून गौरव करतात.
महात्मा फुल्यांच्या लिखनाला भाषेच्या मर्यादा असल्या तरी त्यांच्या विचारांचा वारसा मराठी समाज सुधारकांनी व समजवाद्यांनी पुढे चालविला नाही याबाबत खंत व्यक्त करित लेखक भारतमातेचे सुपुत्र व प्रबोधनयुगाचे साफल्यकार डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची ओळख करून देतात. महात्मा फुल्यांचा विचार वारसाचा कळस म्हणजे डॉ. आंबेडकर होत. याची पूर्णपणे शहानिशा करतांना लेखक कुठेही कमी पडले नाहीत असे मला वाटते.
त्यानंतर डॉ. आंबेडकरांची वैचारिक पार्श्वभूमी, मार्क्सवाद व अनुयायी, लोकशाही समाजवाद, प्रतिक्रांति नंतर क्रांतीची गरज, अंतराष्ट्रीय घडामोडी, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी अनेक विषयांत यशस्विरित्या पादाक्रांत करत लेखक डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे विश्लेषक जाळे गुंफत जातात.
शेवटी डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाची अभिव्यक्ती सांगतांना "मार्क्स आणि बुद्ध" व "क्रांती आणि प्रतिक्रांति" या पुस्तकाचे सर्वांगाने विवेचन करून आंबेडकरांचा बुद्ध धम्म हा कसा वैज्ञानिक आहे हे स्पष्ट करतातच. व समाजवादी वैश्विक विचारधारेला निर्णायक म्हणून बुद्धाच्या नैतिक धम्माची सामाजिक गरज प्रस्थापित करतात. पारंपरिक बुद्ध धर्मातील उणीवा दाखवत त्याचे इतर राष्ट्रांच्या इतिहासात स्थान- धम्माचे वर्तमान सांगून आंबेडकरांच्या वैश्विक धम्माचे स्वरूप व भवितव्य स्पष्ट करतात. समारोपात 'वैज्ञानिक युगात फक्त बुद्धाचा धम्मच एक असा पर्याय आहे जो संपूर्ण मानवसमाजाचे सर्वार्थाने कल्याण करणारा', हे डॉ. आंबेडकरांचे मत लेखक अतिशय चपखलरित्या पटवून देतात; त्यात धम्माची मानसशास्त्रीय गरज व धर्माची मानववंशशास्त्रानुसार झालेली जळणघडण, धम्मात असलेली वैज्ञानिक दॄष्टि, जगाची पुनर्रचना करण्याचे सामर्थ्य, भविष्यातील विज्ञान इत्यादी अनेक संदर्भात केलेले "रावसाहेब कसबे" सरांचे लेखन उल्लेखनीय ठरते.
हा ग्रंथ अतिशय वैचारिक वाङ्ग्मयाचा उत्कृष्ट नमूना आहे हे मला वाचन करतांना सातत्याने जाणवत होते. त्यामुळे जे "सामाजिक क्रांती" या विषयाचे चाहते आहेत त्या सर्व वचाकांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा असा माझा सर्वांना आग्रहच आहे. 🙏
Thats an amazing book of this subject that I ever read.
Thank you !
This entire review has been hidden because of spoilers.
Profile Image for Vaibhav Borse.
9 reviews
May 3, 2021
निसर्गातून बाहेर पडलेल्या माणसाने आपल्या विकासक्रमात एक सुंदर गोष्ट जन्माला घातली ती म्हणजे भक्ती . याच भक्ती मार्गातील शक्तिशाली, संगर्षशिल, विद्रोही मानवाला प्रेम शिकवणारे , जगभरातील भक्तिप्रवाह भारतातील बाऊल अलवार तसेच मीरा , कबीर ,तुकाराम, तसेच सुफी पंथ, ख्रिस्ती संत ते प्रबोधनयात्रा हा समग्र प्रवास या पुस्तकात आपल्याला घडतो . तसेच स्त्रीमुक्तीच्या आद्य प्रवर्तक संत जनाबाई , मीरा , अक्कमहादेवी कशाप्रकारे प्रेमाच्या आधारे स्त्रीमुक्तीची बीज रोवली हे आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळते, तसेच
आताच्या जागतिकीकरणाच्या काळात तर अनिर्बंध स्पर्धेत उतरून स्वतःला रेसचा एक घोडा मानून कोणत्याही मार्गाने जास्तीतजास्त संपत्ती कशी मिळविता येईल आणि बाजाराचे नियम आत्मसात करून आपल्याला बाजारभाव अधिकाधिक कसा मिळेल हे एक उत्तर सध्या चलनात महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे माणसातील प्रेमशक्ती आटत चाललेली आहे. याचा परिणाम म्हणून त्याच्या अस्तित्वाची मूळ समस्या अधिक भेसूर बनत चाललेली आहे. म्हणूनच त्याला या जगात आणि त्याच्या जीवनात "प्रेमापेक्षा अधिक महत्त्वाची अन्य कोणतीही गोष्ट नाही" हे शिकविणे आवश्यक झालेले आहे. आपल्या प्रबोधनाच्या चळवळीत सामाजिक, धार्मिक, राजकीय विषयाबरोबरच या विचारालाही महत्त्वाचे स्थान देणे आजच्या घडीला क���ती आवश्यक आहे हा विचार लेखक प्रकर्षाने मांडताना दिसतात.
प्रेम ना बारी उपजै प्रेम ना हाट बिकाय
राजा प्रजा जेहि रुचै,शीश देयी ले जाय।
- संत कबीर
Displaying 1 - 2 of 2 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.