दत्तप्रसाद दाभोळकर हे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भान असलेले एक भन्नाट लेखक. या पुस्तकातले सगळेच लेख तुफान पण ‘संघ समजून घेताना’ आणि ‘अंधारात चाचपडताना’ हे लेख अत्युच्च दर्जाचे! समाजाच्या जाणिवा जिवंत राहण्यासाठी अशा लेखकांचं समाजात असणं आणि त्यांनी सतत लिहित राहणं हे अत्यंत महत्त्वाचं!!
खूप लक्ष देऊन महत्त्वाची वाक्यं अधोरेखित करून वाचलं. पुस्तकाला पाच स्टार देतोय. मार्क्सवादी विचारांचे आहेत दत्तप्रसाद त्यांच्या ज्येष्ठ बंधुंसारखे, पण तरीही हे पुस्तक खूप छान लिहिलंय. माझ्या वैयक्तिक मार्स्कवादविरोधी विचारांचा या पुस्तकाच्या गुणवत्तेशी काहीही संबंध नाही. अत्यंत उत्तम साहित्य. रूप कुंवरच्या सतीमातेच्या घटनेबद्दल त्यांचं विवेचन उत्तम आहे. एका पातळीवर त्यांनी रास्वसंघावर केलेली टीकाही काही चूक नाही. त्या संघटनेचा कणा तसा आहेच. त्यावर मी, दत्तप्रसाद किंवा संघातला एखादा कट्टर स्वयंसेवकपण खाजगीमध्ये सहमती दर्शवू शकतो. आणि दाभोळकर, त्यांचं कुटुंब आणि बंधूमंडळी ज्या परिस्थितीत वाढले, ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झाले त्यावरून त्यांची अशी मतं का आहेत याचा उलगडा होतो. हि सगळी मंडळी नव्या भारतात आणि नव्या महाराष्ट्रात राहिलेली, बर्लिनच्या भिंतीच्या पडण्याआधी, सोव्हिएट रशियाच्या विघटना आधीची माणसं आहेत. बहुदा स्टालिनच्या किंवा निकोलाई चौसेस्कु, पॉल पॉट अश्या कम्युनिस्ट नेत्यांच्या अत्याचारांच्या उदाहरणाने बदलणारी हि मंडळी वाटत नाहीत. एकाधिकारशाही डाव्यांची अथवा उजव्यांची का असेना, ती एकसारखीच घातक. परंतु, दाभोळकर मंडळी असा विचार का करतात, हे जर त्यांची जडणघडण पाहिली तर फार विशेष वाटण्यासारखं नाही. I read it very closely and thoroughly. Apart from his Marxist economical beliefs, I don’t find anything that is removed from reality about this book. My personal anti-Marxist beliefs can't affect my review of this book, because it's exceptional literature & I can't deny it. His chapter about the Roop Kunwar case is a quite rational and a just inquiry into the event that happened and social conditions that allowed it to happen. In some parts, what he says about RSS is also correct. And given the conditions he grew up in and the place and societal disposition that made him what he is, one can understand why he thinks this way.