कदाचित् यातून आपणाला हवे असलेले प्रकरण निर्माण होऊ शकेल.’ झुंजार म्हणाला. आता भोलाला त्याचे ते बोलणे समजणे शक्य नव्हते आणि झुंजारही भोलाला काय वाटत असेल याकडे लक्ष देत नव्हता. ती मोलकरीण त्याचे ते संभाषण ऐकून त्यांच्याकडे घाबरलेल्या मुद्रेने पाहात होती. पण झुंजार तिच्याकडेही लक्ष देत नव्हता. तो लक्षपूर्वक ते कर्कश संगीत ऐकत होता. घरात आल्यानंतर त्याला तो आवाज तिप्पट मोठ्याने ऐकू येत होता. त्या आवाजात मिसळलेला किंकाळीचा आवाज त्याने दोन वेळा ऐकला होता. झुंजारने भोलाचा हात जोराने दाबला आणि तो म्हणाला, ‘तू एक मिनिटभर हलू नकोस.’ झुंजार त्या खुर्चीला बांधलेल्या मोलकरणीजवळून पलीकडच्या टोकाला असलेल्या दाराजवळ गेला. ते दार उघडताच त्याला त्या भयानक संगीताचा अधिकच जोराचा आव