प्रस्तावना ‘अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी’ या अद्भुत ग्रंथातील पुढील एक गोष्ट विद्यार्थीवर्गासाठी मुद्दाम निराळी काढून प्रसिद्ध करीत आहोत. मूळ ग्रंथ फार विस्तृत व विविध रसांनी परिपूर्ण असल्यामुळे तरूण विद्यार्थ्यांना चटकदार, मनोरंजक व बोधप्रद वाटेल अशी ही गोष्ट मुद्दाम निवडून काढली आहे. सिंदबादने निरनिराळ्या देशांत ज्या सफरी केल्या व व्यापारांत हजारो रूपये कमावले त्या सफरींचा हा वृतांत कल्पित व अद्भुत असला तरी त्यांत निरनिराळ्या देशांची जी माहिती आली आहे ती तरूण वाचकांना अनेक दृष्टींनी उद्बोधक व स्फूर्तीदायक वाटल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजी वाङ्मयांत रॉबिन्सन क्रूसो व गलिव्हर्स ट्रॅव्हल्स वगैरे पुस्तकें वाचून जशी तिकडील वाचकांच्या मनांत