Jump to ratings and reviews
Rate this book

दहशतवादाची रूपे

Rate this book
एखाद्या विषयावर वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्या विषयाचा वेध घेणं ही संजय सोनवणी यांची खासियत. या पुस्तकातील बारा प्रकरणांत सोनवणी यांनी जगभरातील विविध दहशतवादी कारवायांचा ऊहापोह केला आहे. "सनातन हिंदू दहशतवाद,' "ज्यू दहशतवाद', "ख्रिस्ती दहशतवाद', "इस्लामी दहशतवाद - जागतिक परिप्रेक्ष्यात', "इस्लामी दहशतवाद - भारतीय परिप्रेक्ष्यात' अशी शीर्षकं असलेल्या प्रकरणांमधून या विषयाची चर्चा त्यांनी केली आहे.याशिवाय सांस्कृतिक आणि आर्थिक दहशतवादाचीही माहिती त्यांनी दिली आहे. दहशतवादाची कारणं, त्याचे परिणाम यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

152 pages, Paperback

First published March 26, 2012

6 people want to read

About the author

Sanjay Sonawani

59 books16 followers
Sanjay Sonawani is famous author from Maharashtra, have penned over 79 books in Marathi. He is a social activist as well and has been promoting "One World: One Nation" concept for better tomorrow since last 10 years.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
3 (100%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 2 of 2 reviews
Profile Image for Akash Balwante.
104 reviews5 followers
September 22, 2024
दहशतवाद म्हंटले की काही अतिरेकी निष्पाप जीवांना ठार करत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. दहशतवाद हा एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याची अनेक रूपे विविध धर्मात वावरत आली आहेत यावर हे पुस्तक प्रकाश टाकण्याचे काम करते.
इस्लाम हा दहशतवादात अग्रेसर असला तरीही तो कमी जास्त प्रमाणात हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, ज्यू आणि शीख यांतही आढळून येत असतो. इतिहासात पाहिले असता आपल्याला याची बरीच उदाहरणे आढळून येतात. सनातनी हिंदूंनी बौद्ध लोकांचा केलेला नरसंहार, एल टी टी इ संघटना, बऱ्याच शतकांपूर्वी झालेले क्रुसेडस तसेच आधुनिक काळात अमेरिका या बहुसंख्य ख्रिश्चन राष्ट्राने मध्य आशियावर लादलेली युद्धे, खलिस्तानी चळवळ इत्यादी मुस्लिमेतर घटकांनी केलेला अत्याचार दहशतवादच म्हंटला पाहिजे.
एक सामूहिक घटक वर्चस्वासाठी दुसऱ्या सामूहिक घटकावर धर्माच्या, राष्ट्राच्या व संस्कृतीच्या नावाखाली अन्याय करतो यास लेखकाने दहशतवाद म्हंटले आहे. दहशतवादास प्रति दहशतवाद हे कदापि उत्तर होऊ शकत नाही कारण प्रतिदहशतवाद दहशत न संपवता त्याच्या वाढीसच कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो.
सांस्कृतिक आणि आर्थिक ही दहशतवादाची दोन अशी रूपे आहेत जे वरकरणी हानिकारक वाटत नसली तरीही ती स्लो पॉइजन प्रमाणे काम करतात. आपली संस्कृती दुसऱ्या समाजावर जबरदस्तीने लादणे आणि दुसऱ्या संस्कृतीबद्दल द्वेष निर्माण करणे हे काम सांस्कृतिक दहशतवाद करतो. यासाठी साहित्य, चित्रपट, वर्तमानपत्रे या माध्यमांचा प्रभावीपणे वापर केला जातो.
आर्थिक दहशतवादात एक सुबत्ता असलेला देश दुबळ्या देशाचे आर्थिक कंबरडे मोडायचा प्रयत्न करतो. अमेरिका, चीन हे देश याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येतील. निरनिराळी आर्थिक आमिषे दाखवून धर्मांतर घडवणे, इतिहासात जिझिया कर लावून गरीब वर्गाला धर्मांतरासाठी उद्युक्त करणे अशी काही उदाहरणे आपल्याला आढळून येतात.
संजय सोनवणी यांच्यावर ब्राह्मणद्वेष्टे लेखक म्हणून नेहमी टीका होते परंतु या पुस्तकात त्यांनी हिंदू, मुस्लिम, ज्यू, ख्रिश्चन, शीख अशा सर्व समुदायांतील मूलतत्ववाद्यांवर ताशेरे ओढले आहेत.
Profile Image for Sagar Bhandare.
56 reviews6 followers
July 22, 2016
दहशतवाद आणि त्यांची मानसिकता याचा या पुस्तकात छान वेध घेतला आहे. जगभरातले दहशतवाद देखील चर्चिले आहेत.
Displaying 1 - 2 of 2 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.