Kindle Notes & Highlights
ती किंचित चाळवाचाळव करू लागली. तिला कदाचित तो स्पर्श जाणवू लागला असावा. तिला व्यापून राहिलेल्या भयाण काळ्या गुंगीत एक उजेडाची फट पडल्यासारखे झाले असावे. तिच्या जवळच माणसांचा, वाहनांचा कोलाहल चालू होता; पण त्याचे तिला भान नव्हते. खडबडीत फूटपाथवर तिची पाठ टेकली होती; पण त्याचा दगडी कठीणपणा तिला जाणवत नव्हता. किंबहुना आपल्या स्वत:च्या शरीरातून क्षणोक्षणी उठणाऱ्या सहस्त्र कळांच्या दु:खाच्याही पलीकडे ती पोहोचली होती. परंतु तरीही त्या चिमुकल्या हातांचा मऊ, उबदार स्पर्श तिला जाणवला असावा. जन्मभर कदाचित ती त्या स्पर्शासाठी आसुसलेली असेल. आजवर तिला लाभलेले स्पर्श वखवखलेले, वासनांनी लडबडलेले असतील.
...more

![खेकडा [Khekada]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1484890041l/33952784._SY475_.jpg)