राजे, आमचा तुम्हाला आग्रह नाही. तुम्हाला मृत्यू जवळचा वाटत असेल, तर हाताशी असेल ती शिबंदी घ्या, आणि सरळ मिर्झाराजांवर चालून जा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. तुमची खांडोळी उडाली, तरी मी ते सहन करीन. पण राजे… या कुशीनं एक आत्महत्या करणाऱ्या भ्याड नादान पोराला जन्म दिला, हा ठपका माझ्या नशिबी लावू नका. एवढं केलं, तरी मातृऋणातून सुटलात.

![गरुडझेप [Garudzep]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1480777907l/33232871._SY475_.jpg)