माधवरावांच्या मस्तकी पागोटे बसवीत असता त्यांचे लक्ष माधवरावांच्या अंगरख्याकडे गेले. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अंगरख्यावर छातीजवळ मातीचे डाग पडले होते. ते झटकून राघोबा म्हणाले, ‘‘बघ, तुझ्या अंगरख्यावर डाग पडले!’’ ‘‘राहू दे, काका! ते डाग झटकून जायचे नाहीत!’’ —आणि झरकन वळून माधवराव डेऱ्याबाहेर पडले.

