ब्लॉग लेखन. माधुरी कामत यांनी सहज हा प्रकार हाताळून पाहिला आणि थोड्याच काळात त्या ह्या प्रकाराला सरावल्याही. आपल्या मनातलं स्क्रीनवर उमटून समोरच्यापर्यंत पोचतंय आणि तिथून दादही मनापासूनच येतीये हे पाहिल्यावर त्यांचा उत्साह दुणावला. दोन वर्षांहून अधिक काळ माधुरी कामत ब्लॉगलेखन करत आहेत. विषय वेगवेगळे असले तरी त्यांची मनमोकळेपणाने लिहायची शैली आपलं मन प्रसन्न करून टाकते. त्यांच्या ब्लॉग लेखन आणि फेसबुवरील पोस्टचं संकलन म्हणजे हे ईबुक ''माझ्या मनाचे कवडसे''. माधुरी कामत यांचं लेखन म्हणजे त्यांच्या मनाचे कवडसे - अनेक बाजूंनी आलेले... स्वच्छ... नितळ... प्रकाशमय... आणि सकारात्मकही.