पुत्र असावा ऐसा गुंडा “बफेलो बिल’ नाव तुम्ही ऐकलंय का?’’ गोष्ट सांगण्याच्या लहरीत आलेल्या बिपिनने विचारले आणि छोट्या विजूने ताबडतोब उत्तर दिले, “माहीत आहे. त्याची कॉमिक्स खूप पाहिलीत मी. बफेलो म्हणजे रानरेडे, त्यांची त्याने खूप शिकार केलीन् म्हणून त्याचं नाव पडलं ‘बफेलो बिल.’ हो ना रे बिपिनबाबू?’’ “बरोबर.” “हं-हं-तो फताडी हॅटवाला होय? अमेरिकन मुलांचा हीरो ना तो?” मोना मध्येच म्हणाली. “काय बरं म्हणतात तसल्या हीरोला?’’ “काऊबॉय!’’ पुन्हा विजूचे उत्तर तयार! “या विज्याने त्याचा सिनेमा पण पाहिलाय म्हणे. पण मला नाही आवडत काऊचिऊच्या गोष्टी!’’ मोना अर्थात विनोद करीत होती ‘काऊ’ म्हणजे गाय हे कळण्याइतपत इंग्रजी तिला नक्कीच येत होते. “अमेरिकेचा शोध लागल्यावर तिथे जाऊन स्
Collection of short stories for children as narrated by Bhagwat's character Bipin. Good stories, some of them a little mature, tries to induce maturity in teenagers.