...‘अर्थात’ या पुस्तकात आपल्याला अर्थशास्त्रामधल्या मूळ संकल्पना, त्यांचा इतिहास आणि प्रसिद्ध अर्थतज्ञांच्या जीवनकहाण्या एकत्रपणे वाचायला मिळतील. आदिमानवापासून अगदी आतापर्यंतचा जागतिक अर्थव्यस्थेचा इतिहासही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. पण यातला सर्वात मुख्य भाग म्हणजे ज्याला अर्थशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नाहीये किंवा ज्याला अर्थशास्त्राची भीती वाटते त्यालाही अतिशय सोप्या, सरळ आणि रंजक पद्धतीनं, गणित न वापरता अर्थशास्त्राची मूलतत्वं समजावून सांगितली आहेत. हे वाचल्यावर इकॉनॉमिक टाईम्स किंवा सीएनबीसी यातल्या चर्चा किंवा लेखही कोणालाही सहजपणे कळू शकतील आणि जीडीपी, रेपोरेट, फिस्कल डेफिसिट, करंट अकौंट डेफिसिट, इन्फ्लेशन, रिसेशन, डिप्रेशन, फॉरे&#