'Chandramukhi' throws light on the life and struggle of a stage dancer. The writer has presented the life and troubles of stage performers in such a way that a reader can easily connect himself from their lives. Despite of her continuous encounters with the corrupt people, Chandramukhi saves her respect and dignity in this society and doesn't let her womanhood get affected.
राजकारण, तमाशा, तमाशातलं राजकारण आणि राजकारणातला तमाशा अशी रंजक कहाणी! विशेषतः सध्या महाराष्ट्रात आणि देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा विचार करता हे पुस्तक जास्त आवडलं.
विश्वास पाटील यांची 'पानिपत' कादंबरी खूप वर्षापूर्वी वाचली तेव्हा आवडली होती. म्हणून कुतूहलाने मी ही वाचायला घेतली आणि फार निराशा झाली. जी अलंकारिक भाषा/वाक्ये एखाद्या ऐतिहासिक कादंबरीत शोभतील, ती इथे फार विसंगत वाटतात. आणि दर पानावर अशी एक नाही तर कित्येक वाक्ये आहेत (खाली नमुने पहा). कथानक देखील फार काही लक्षवेधी आहे असे नाही. त्यामुळे एक चतुर्थांश वाचून मी शेवटी नाद सोडून दिला -
राक्षसाच्या जबड्यातून आगीचा लोळ बाहेर पडावा तसा फॅक्स मशिनमधून कागद बाहेर आला
मी सत्तेच्या शृंगारलेल्या घोड्यावर विराजमान होणार आणि तू अंथरुणावर खिळून राहणार
सिंहीणीच्या गुहेत अचानक शिरणाऱ्या वटवाघळासारखा तो पुरता गारठून गेला
लावणी ही लोककला तेवडीच महत्वाची जेवडी की गुजराती गरबा आणि दांडिया…. पण आज हे डोंबऱ्याचा खेळ तूच नजरेने पाहीला जातो… हे मृगजळ संपायला पाहिजे आणि त्यातच पाहिला पाऊल म्हणजे चंद्रमुखी… अगदी हृदय जिंकून घेणारे शब्द आणि मन भरवणारे लावण्यांचे मिश्रण महनजे ही कादंबरी…. एक पुस्तकी रसिक साठी सर्वात उत्तम ठिकाण हे चंद्रमुखी…
A detailed tale of a rising political star who falls for a leading traditional tamasha nautch singer and dancer. The story describes two very different worlds, tamasha art and corrupt Indian politics.