What do you think?

Tu Bharmat Aahasi Vaya
THIS BOOK CAN BE SAID TO BE THE FRUIT OF VA PU`S PENANCE OF LAST 40 YEARS. HE SEEMS TO COME AT A CONCLUSION OF ALL HIS FINDINGS ABOUT A HUMAN MIND. IT HAS THE BASE OF DNYANESHWARI. IT IS NOT A TYPICAL LOVE STORY; ON THE CONTRARY IT REVEALS A VERY FIRM MINDSET. IT IS THE STORY OF A CIRCLE CONTINUOUSLY MOVING AROUND THE CENTER POINT. IT IS A STORY OF LOVE WHICH KNOWS NO SELFISHNESS, NO RIGHTS. IT MAKES US REALISE FOR THE FIRST TIME, THAT AS THERE IS IMMENSE HAPPINESS BEYOND HAPPINESS, THERE IS ALSO IMMENSE HAPPINESS BEYOND EVERY SORROW, PAIN, AND ACHE. SAYARA, THE MAIN CHARACTER; SHE IS A MUSLIM BY BIRTH, BUT SHE CRAVES FOR THE PERFECTION OF HINDU RELIGION. SHE HERSELF IS OF A SECULAR MIND. SHE IS NEUTRAL ABOUT HERSELF. YET, SHE HAS LOST HERSELF IN HER OWN FRESHNESS. SHE DOES NOT ASK FOR ANYTHING, BUT SHE RECEIVES BEYOND IMAGINATION WHILE OTHERS WITH LOTS OF MONEY LOSE CONTINUOUSLY. IN THIS NOVEL, THE NARRATION, THE CHARACTERS, THE IMAGES AND THE WHOLE PLOT IS SO HARMONIOUSLY BLENDED TOGETHER THAT AFTER COMPLETING IT WE JUST FEEL THE WAVES OF SACRIFICE AND IMMENSE LOVE THROUGHOUT OUR BODY AND SOUL. MANDLIK, WHO IS SAYARA`S TEACHER, DOES HE REALLY EXIST? OR IS HE JUST AN IMAGINATION OF HER MIND? BUT SOMETIMES, THE PRESENCE PLAYS THE GAME WELL THAN THE ANALYSIS. SAYARA IS SOMEONE DIFFERENT; WE FEEL HER PRESENCE EVEN AFTER COMPLETING THE NOVEL. SHE LINGERS INTO OUR MINDS AND WE ENJOY IT. SHE CAPTIVATES OUR MIND. IT IS THE UNIVERSAL TRUTH THAT VA PU`S WRITING HAS THE POTENTIAL TO CAPTURE THE READERS, BUT THIS PRESENT WORK WORKS BEYOND HIS POTENTIALS. HIS WORDS REVEAL, `WHAT DO I SEE IN ONE FLOWER? I CANNOT FIND THE BEGINNING OR THE END OF THE FRAGRANCE THAT ORIGINATES FROM A FLOWER. THE GENTLE BREEZE CARRIES IT TO FAR AWAY DISTANCES; WIND IS THE MESSENGER ANNOUNCING THE UNIFICATION OF THE LAND AND THE SKY. I SEE THIS ALL IN ONE FLOWER.` सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश. वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्यांचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसांपर्यंत नेणारा दूत. एका फुलात मला इतकं दिसतं.
- GenresMarathi
96 pages, Paperback
Published January 1, 1992
About the author
V.P. Kale
62 books415 followersVasant Purushottam Kale, popularly known as Va Pu, was Marathi writer who wrote short stories, novels, and biographical sketches.He authored more than 60 books. His well-known books include Partner, Vapurza, Hi Waat Ekatichi, and Thikri.
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 15 of 15 reviews
September 24, 2019
The main characters in the book are representatives of +&-, rich & poor, Black & white or Yin & Yang. More than character depth, the depth of their thoughts is to be observed. A good read by VA PU !! 🙏
January 16, 2014
पहिल्या तीन पानांतूनच कादंबरीची पात्रता लक्षात येते...कमी वेळात व.पु. यानी खूप जवळून आयुष्य पाहिले याची प्रचीती त्यांच्या लिखाणातून येते...
Read
August 13, 2024#bookreview
पुस्तकाचे नाव :- तू भ्रमत आहासी वाया
पुस्तक प्रकार :- कादंबरी
लेखक :- व.पु.काळे
प्रकाशन :- मेहता पब्लिकेशन
मूल्य:- ९०₹
पृष्ठ संख्या:- ८४
वपुंचं पुस्तक वाचन म्हणजे एक पर्वणीच. मला काही सांगायचं आहे पण मला शब्दच सापडत नाहीत आणि हे न सापडलेले शब्द म्हणजे व.पु.काळे याचे लेखन. वपुंची प्रत्येक कलाकृती वाचताना याचा प्रत्यय येतो. खरंतर वपुंनी कथेच्या तुलनेत कादंबरी कमी लिहिल्या. त्या काही कादंबरीं मधील एक म्हणजे 'तू भ्रमत आहासी वाया'
प्रेमभंगा नंतर काय? आत्महत्या की आयुष्य निराशेच्या गर्द अंधारात ढकलून द्यायचे? की प्रेमभंग करणाऱ्या प्रियकर/प्रेयसीला गुरू मानून एक नवीन आयुष्य सुरू करायचे.
तैसी हे जाण माया|
तू भ्रमत आहासी वाया|
शस्त्री हाणीतलीया छाया|
जैसी अंगी न रूपे||
या संत ज्ञानेश्वरांच्या एका ओवीने प्रेरित होऊन वपुंनी आपल्या आध्यात्मिक चिंतनाला लेखनीची ऐश्वर्यजोड देऊन लिहिलेली व जगण्याचे तत्वज्ञान सांगणारी ही लघु कादंबरी.
सायरा, म्हणजेच वपुंच्या लेखणीतून जन्माला आलेली कादंबरीची नायिका. नायिकेला स्वत:च्या प्रेमभंगातून आलेल्या अनुभवातून ती इतरांची आयुष्य कशी बदलते याची ही गोष्ट. खरंतर सायरा ही तुमच्या माझ्यासारखीच एक सामान्य पण तरी ती एक वेगळं रसायन वाटते. तिचे अवलोकन करणारा वाचक तिच्यात विरघळून जातो. आकलनाच्या मर्यादा ओलांडून अनुभूतीच्या नव्या प्रदेशात सायरा आपल्याला घेऊन जाते. तिच्या आयुष्यात जो कुणी येईल, ती त्याच्यासारखी होऊन जाते.
वपुंच्या कादंबरीतील ही नायिका आदर्शवत वाटते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करायला गेलं तर तेही शक्य होत नाही कारण आपल्याला आपल्या वर्तुळाबाहेर जाऊन विचार करायला ती भाग पाडते. बोलता बोलता ज्ञानेश्वर, कबीर, बुध्द, ओशो यांचे विचार पेरत जाते. आपल्या सोबत राहून प्रत्येक क्षणातील सौरभ गोळा करण्याचा विचार ती आपल्याला देते आणि म्हणूनच ती आपलीशी वाटते असं मला वाटतं.
बघायला गेलं तर कादंबरी छोटी, त्यातील गोष्टही छोटीच. पण मोठी आहे ती या कादंबरीतील विचारगंगा. आणि म्हणूनच प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी, असं मी सांगणार नाही, पण प्रत्येक वाचणाऱ्याने ती अनुभवावी असं मी म्हणेन.
निवडक संवाद:
"रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं"
"आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्वं दुसर्याला थेअरी वाटते."
"जगातला सर्वोच्च आनंद निर्भयतेत आहे आणि माणसाला निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रेमात आहे"
"स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती"
गायत्री😇

February 13, 2020
कथेची नायिका सायरा प्रेमभंग झाल्यावर मोठमोठ्या तत्त्वज्ञानानं भरलेल्या गप्पा गोष्टी करते, पण प्रत्यक्षात स्वत:बद्दल काही विचारल्यास आजची सायरा वेगळी, कालची वेगळी अशी तिची स्वत:बद्दलची उत्तरं उडवाउडवीची वाटतात. तिला तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या मंडलीकांची उपस्थिती एखाद-दुसरा प्रसंग सोडल्यास फारशी नाही. तापट असणाऱ्या(सायराच्याच दृष्टीकोनातून) ओंकारनाथांना ती पाहीजे तसं बोलून घेते, त्यांना वेगवेगळी उदाहरणं देते, विचार करण्यास भाग पाडते, आणि त्यांनी तिला अनेक गोष्टी विचारायला लावायलाही भाग पाडते. पण यातून तिला काय साध्य करायचं हे तिला स्वत:लाही माहीत नाही. त्यांच्यात सकारात्मक बदल होतोय हे तिला कळतंय, पण त्यावर विशेष काही मत ती व्यक्त करत नाही. फक्त एवढंच म्हणते की, सर हे फक्त तुम्हीच करू शकता आणि जोडीला आणखी तत्त्वज्ञानाचा डोस वगैरे वगैरे.. विनीताला नटूनथटून मिरवण्यापलीकडे महत्त्वाचं काही वाटत नाही, त्यामुळे आपल्यालाही ती फारशी महत्त्वाची वाटत नाही. आपण जिच्यासाठी बदलतोय, तिला आपण हवे आहोत की नाही हे ओंकारनाथांना माहीत नाही. पण त्यांच्या बाबतीत कमीत कमी स्वत:मधील बदल त्यांना स्वत:ला सुखावतोय हे तरी निदान समजतं. सायराच्या बाबतीत काहीच कळत नाही...
‘तैसी हे जाण माया ।
तू भ्रमत आहासी वाया ।
शस्त्री हाणीतलीया छाया ।
जैसी अंगी न रूपे ।।’
या ओव्यांतून कथेच्या अनुशंगाने काय समजायचे तेही कळत नाही.
सायराच्या वागण्याचं म्हणावं असं तथ्य मला न सापडल्यानं, कळूनही ती मला वळली (झेपलीही) नाही हे मी मान्य करते.🤷🏻♀️
ता.क.: पुस्तक वपुंनी😇 लिहीलं असल्यानं तत्त्वज्ञानाचा भरणा असूनही काही वाक्य छान आहेत.👌🏻👌🏻
उदा.
— रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.
— प्रचिती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.
— प्रवासाचा अनुभव घेणारा प्रत्येक प्रवासी वेगळा. म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्त्वं दुसऱ्याला थेअरी वाटते.
(या वाक्यानुसार सायराची तत्त्वं मला थिअरी वाटली म्हणायला हरकत नाही😅)
इत्यादी इत्यादी...

December 19, 2024
The book starts as love story but it's a philosophical teaching book. Something one should read post breakup. It's a beautifully written book. You'll be able to ralete to Sayara, the main character in the book. If you recently got dumped by your partner. At least it helped me.
May 9, 2017
bhayank pustak ahe. sodwatach nahi.
September 23, 2017
This book taught me everything I am searching for. How to handle failures in lover affairs or in general life. changed my mindset. Va Pu is fabulous.
May 16, 2020
Excellent read !
Very well articulated and engaging story; That tells the secrets of life very subtly !!! One of the unique piece of writing from V.P.Kale.
Very well articulated and engaging story; That tells the secrets of life very subtly !!! One of the unique piece of writing from V.P.Kale.
August 7, 2022
वपुंच लिखाण दरवेळी विचाराच्या भोवऱ्यात अडकवून जातं. योग्य नावाच्या पुस्तकातून अतिशय मार्मिक सांगणं. नक्की वाचा.
February 22, 2020
Less of a story.... More of philosophy fest...
December 29, 2020
All time favourite, every line of this book makes you to ponder on life. Amazing take on life.
April 6, 2014
तू भ्रमात आहेस वाया ऐक वेगळाच अनुभव आहे ज्याला शब्दांना मध्ये मांडणे बरेच अवघड आहे. कथा खूपच लहान आहे पण ती जरूर तुमच्या मनाला स्पर्शून जाते. ह्या कथेची नायिका सायरा नावाची एक मुलगी आहे जिचे आयुष्य एक संगर्ष आहे. आता तुम्ही म्हणाल की नायाकीचे नाव सायरा कसे काय ?. मला वाट वपु ह्यांना हे दाखवायचे आहे की धर्म कोणता पण असुदे पण माणसाला तेवढाच संगर्ष करायला लागतो.
कथेची सुरवात सायरा हिच्या प्रेम भंग ह्यांनी होते ती सगळ्या गोष्टी मधने कशी सावरते आणि परत जीवनावर प्रेम करायला लागते ह्याचे मध्ये तिला मांडलिक ह्यांची कशी साथ मिळते हे दाखवले आहे. ओमकारनाथ ज्याच्या कंपनी मध्ये ती काम करत असते तो तिच्या विचारांना कडे आकर्षित होतो आणि तिच्या मध्ये आधार सोध्याला लागतो हा पण कथेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. कथा जरी एवढी साधी असली तरी वपु ह्यांनी सायरा हे व्यक्तिमत्व ह्याला जबरदस्त वैचारिक बाजू दिली आहे ज्याच्या प्रत्यय येतो तुम्हाला पदो पदी येतो. एकूणच हा अनुभव नक्कीच एकदा घेण्य सारका आहे.

Want to Read
April 7, 2017good book
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 15 of 15 reviews